गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

चार्ल्स शोभराज ( भाग चार )दुसरे लग्न होऊन .पुन्हा घटस्फोट झाला ..आता तरी याचे आणि याच्या कुटुंबियांचे डोळे उघडतील असे वाटत होते ..मात्र तसे झाले नाही ..एकदा तर कहर असा झाला की..त्या व्यसनीच्या आईला जेव्हा रवीने सहज ..व्यसनीच्या भावाने ओव्हरड्राफ्टची सवलत घेवून बुडवलेल्या बँकेच्या भानगडी बद्दल ..नेमके काय झाले असे विचारले ..तेव्हा ती मोठी तोऱ्यात म्हणाली ..बघा ना हे बँकवाले कसे असतात .उगाचच अडकवलेय त्यांनी माझ्या मुलाला त्यात ..त्याने भले ओव्हरड्राफ्ट मागितला असेल ..त्यांनी द्यावाच का त्याला ? आता धंद्यात त्याला नुकसान झाले ..त्यात त्याचा काय दोष ? तिचे असे मुलाचे बाजू घेणे पाहून...आम्ही थक्कच झालो . सगळे कुटुंबच फ्राॅड होते एकंदरीत . नंतर मध्ये एक वर्ष गेले ..त्या काळात हा दोनतीन वेळा आमच्या सेन्टरच्या कार्यकर्त्यांना भेटला बाहेर ..मात्र पिणे सुरु होते ..एका कोणत्यातरी दुसऱ्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचार देखील घेवून झाले एक दोनदा ..मध्ये मध्ये बातम्या ऐकायला मिळत होत्या कि आता सगळे भाड्याच्या घरात राहायला आलेत ..भावू ..वहिनी ..खाजगी कंपनीत नोकरी करत आहेत ..हा व्यसनी आपल्या इंग्लिश बोलण्याच्या जोरावर लहान मोठ्या नोकऱ्या मार्केटिंग च्या नोकऱ्या करतो ..दोन तीन महिन्यात नोकरीत काहीतर घोटाळा करून नोकरी सोडून देतो ..पुन्हा पुन्हा पिणे सुरूच रहाते..चला त्याच्या फसवणुकीच्या तडाख्यातून आपले सेंटर तरी सुटले आता... याच समाधानात होतो आम्ही ..पण कसचे काय ..एकदा आमच्या सेंटरला वेळोवेळी आर्थिक मदत केलेल्या ..तसेच सेंटरचे हितचिंतक असणाऱ्या आमच्या स्नेह्यांचा फोन आला आम्हाला ..की मी सदर व्यक्तीला तुमच्या कडे उपचार घेण्यास पाठवतोय ..ते याच्याच बद्दल बोलत होते ..हे समजल्यावर आम्ही त्या हितचिंतकांना स्पष्ट सांगितले ...की ते सगळे फ्राॅड लोक आहेत..फी भरत नाहीत सेन्टरच्या उपचारांची ..खोटे चेक देतात वगैरे ...त्यावर स्वभावाने अतिशय दयाळू असणारे आमचे स्नेही म्हणाले ..त्यांच्या फी ची जवाबदारी मी घेतो ..तेव्हा माझ्या विनंतीला मान देवून त्याला उपचारांसाठी दाखल करून घ्या ..त्या सगळ्या कुटुंबाचीच परिस्थिती आता खूप बिघडलीय ..त्यात याचे दारू पिणे अधिकच त्रासदायक होतेय त्यांना ..सेंटरला मदत करणारे स्नेही म्हणून आम्हाला त्यांचा शब्द मोडता आला नाही ..शिवाय त्याच्या उपचारांचा खर्च करण्याची त्यांनी तयारी दर्शवली होती त्यामुळे नाईलाजाने आम्ही त्याला पुन्हा दाखल करून घेतले ..वारंवार होत असलेल्या रीलॅप्स मुळे तो पूर्ण नकारात्मक विचारसरणीचा झालेला होता ..त्याला समुपदेशन करण्याचा प्रयत्न व्यर्थच होता ..समस्या सगळ्या कुटुंबात होती ..प्रामाणिकपणे नोकरी न करता ..पैंश्याचे घोटाळे करणे..गोड बोलून लोकांकडून उसने पैसे घेवून आपल्या गरजा भागवणे ..क्लब ..उंची कपडे ..वगैरे मौजमजा इतरांच्या पैशावर करणे ..आपण सधन ..समृद्ध आहोत असा देखावा करत रहाणे ..आणि जगात मूर्ख लोक खूप आहेत ..वेळोवेळी वेगवेगळ्या लोकांना टोप्या घालणे ..लोकांच्या चांगुलपणावर आपली चूल पेटती ठेवणे ..हा सगळ्या कुटुंबाचाच गुणधर्म बनला होता ..खरे तर त्या व्यसनी पेक्षा त्याच्या कुटुंबियांनाच समुपदेशनाची जास्त गरज होती ...
या वेळी उपचार देण्यात त्या मुलाच्या वाहिनीने पुढाकार घेतला होता म्हणे ..तिने पहिल्या महिन्याच्या फी चा नेहमी प्रमाणे चेकच दिला ..त्यांच्या लौकिकानुसार तो चेक बाउन्स झाला ..आम्ही ताबडतोब रोख पैसे भरा ..नाहीतर याला सोडून देवून असा दम दिल्यावर ..त्याच्या वाहिनीने रोख पैसे आणून दिले पहिल्या महिन्याच्या फी चे ..त्याला याला किमान सहा महिने तरी उपचार द्यावेत असे ..त्या स्नेह्यांनी सांगितले होते ..पुढे दोन महिने ..आज देतो.. उद्या देतो ..असे करत त्यांनी फी देणे टाळले ..व्यसनीला केंद्रात भेटायला येणे देखील बंद केले ..इकडे हा व्यसनी देखील मला डिस्चार्ज हवा असा रोज हट्ट करे शेवटी वैतागून आम्ही ...त्याच्या उपचारांसाठी गळ घालणाऱ्या आमच्या स्नेह्यांकडे गेलो ..त्यांना सर्व परिस्थिती सांगितली ..तेव्हा त्यांनी जे सांगितले ते ऐकून थक्क झालो आम्ही ..त्या स्नेह्यांचा मोठा बिझनेस होता ..त्यात त्यांनी व्यसनीच्या बँक बुडवणाऱ्या भावाला ..वाहिनीला नोकरी दिली होती म्हणे ..तसेच या व्यसनीच्या सहा महिन्यांच्या उपचारांचे पैसे ५० , ००० ( पन्नास हजार ) आगाऊ त्याच्या वडिलांकडे त्यांनी दिले होते ..मात्र त्याच्या वडिलांनी ते पैसे आम्हाला न देता मध्येच गडप केले असावेत ..हे सगळे कुटुंब फसवेगिरी करणारे आहे हे मला माहित आहे ..तरी देखील मी त्यांना मदत करतोय ..कारण मला आशा आहे कि हे सुधारतील ..मी त्याच्या आई वडील ..भावू वहिनी ,सर्वांशी बोललो आहे ..की या पुढे तुम्ही प्रामाणिक पणे वागाल तरच मी तुम्हाला मदत करीन ..यावर त्यांनी तसे कबुल केले म्हणून मी त्यांना मदत करतोय असे त्या स्नेह्यांनी आम्हाला सांगितले ..मी देईन तुम्हाला त्याच्या उपचारांचे पैसे सगळे ..असे आश्वासन त्यांनी दिले ..मग आमचा नाईलाज झाला ..याच्या वडिलांनी मुलाच्या व्यसनमुक्तीच्या उपचारांसाठी मदत म्हणून मिळालेले पैसे देखील गडप केले आहेत ..हे ऐकून माझे डोकेच फिरले ..मी रविला म्हणालो ..यार या लोकांना जो पर्यंत एखाद खट भेटून यांना जेलमध्ये पाठवत नाही तोवर कदाचित यांचे डोळे उघडणार नाहीत ..लोकांच्या चांगुलपणाचा नेहमी गैरफायदा घेतात हे लोक ..जरी उपचार खर्चाचे सगळे पैसे तुम्हाला देतो आमच्या स्नेह्यांनी सांगितले होते तरी ..त्या चांगल्या व्यक्तीला खड्यात घालणे आम्हाला प्रशस्त वाटत नव्हते ..शेवटी मी एक प्लान केला ..या व्यसनीला सेंटर मधून पळून जाण्यास मदत करण्याचा .. व्यसनमुक्ती केंद्राच्या इतिहासात झालेली ही पहिली घटना असावी ..जेथे केंद्राचे प्रमुख कार्यकर्तेच व्यसनीला केंद्रातून पळून जाण्यास मदत करणार होते ..मी माझा प्लान रविला सांगितला ..नाहीतरी याचे वडील पैसे भरणार नाहीत हे नक्की झालेय ..आपले स्नेही कितीही दयाळू असले तरी ..या लबाड कुटुंबाला मदत करण्याच्या नादात आंधळे झालेत ..त्यांच्याकडून याच्या उपचाराचा खर्च पुन्हा मागणे आपल्याला प्रशस्त वाटत नाहीय ..कारण त्यांनी सहा महिन्याच्या उपचारांचे दिलेले पैसे याच्या वडिलांनी गडप केलेत ..आता पुन्हा त्यांना भुर्दंड का द्यायचा आपण ..शिवाय तो व्यसनी देखील केंद्रात नीट शांत राहत नाहीय ..सारखा डिस्चार्ज साठी हट्ट करून डोके खातोय ..तेव्हा याला पळून जावू दिलेले बरे ..रविला पटले माझे म्हणणे ...मग आम्ही आमच्या एका निवासी कार्यकर्त्याला विश्वासात घेवून आमचा प्लान समजावून सांगितला ..दुपारी रवी आणि मी दोघे जेवणासाठी घरी जावू तेव्हा ..मुद्दाम प्रमुख गेट उघडे ठेव ..त्या व्यासानीला बाहेर बोलावून सांग ..की तुला त्याची दया आलीय ..म्हणून तू त्याला पळून जाण्यास मदत करत आहेस ..गेट उघडे आहे ..जा पटकन निघून असे म्हणून त्याला पळून जावू दे घरी .
( बाकी पुढील भागात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा